वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी   

येरवडा : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने वडगावशेरी, चंदननगर परिसरात तंबाखू, गुटखा विक्री करणार्‍या व्यापार्‍यांचा निषेध करून गुटखा, तंबाखू, सिगरेटची होळी करण्यात आली. शिवसेनाच्या पदाधिकार्‍यांनी चंदननगर येथील  नागरिकांच्या जीवाची हानी होणार्‍या गुटखा, सिगारेट, तंबाखू या पदार्थाची होळी केली. डॉ. कल्याणजी गंगवाल व महानगर शिवसेना प्रमुख पुणे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते होेळी करून व्यसन मुक्तीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन हेमंत बत्ते यांनी केले.
 
डॉ. कल्याण गंगाळ म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणात तरुणांचा वर्ग व्यसनाकडे वळत आहेत. यामुळे देशाची मोठी हानी होत आहे. यांना वेळीत सावरले पाहिजे. यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. तंबाखू, गांजा, अंमली पदार्थांचे पीक घेणार्‍यावर तात्काळ कारवाई करून त्यांची शेती जप्त करावी. तसेच छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या कारखानदारांना कडक शासन करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ चौधरी, शंकर संगम, उद्धव गलांडे, उदय खांडके, मनोज अष्टेकर ,रमेश साळुंखे, श्याम ताठे उपस्थित होते.

Related Articles